29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रदुसरी लस घेऊनही १५ पोलिस बाधित; २५७४ पोलिसांनी घेतला पहिला डोस

दुसरी लस घेऊनही १५ पोलिस बाधित; २५७४ पोलिसांनी घेतला पहिला डोस

एकमत ऑनलाईन

पिंपरी : कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेऊनही १५ पोलिस कोरोना बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८४ टक्­के पोलिसांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यापासून पोलीस कर्मचारी फ्रंट लाइन वर्कर म्हणून रस्त्यावर उतरले. कधी प्रतिबंधात्मक परिसराला बंदोबस्त तर कधी रस्त्यावरील नाकाबंदी. कधी वाहनांवर कारवाई करताना थेट नागरिकांच्या संपर्कात पोलीस येत होते. त्यातून पोलिसांना करोनाची बाधा होऊ लागली.

आतापर्यंत ७२९ पोलसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार पोलीस कर्मचा-यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तर सध्या ८८ पोलीस कर्मचारी बाधित आहेत. त्यापैकी ७१ जण गृहविलगीकरणात असून १७ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन पोलीस कर्मचारी ऑक्­सिजनवर आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्­तालयात तीन हजार १४० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यापैकी दोन हजार ५७४ पोलिसांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर एक हजार १५२ जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मात्र करोना लसीचा दुसरा डोस घेऊनही १५ पोलीस कर्मचारी करोना बाधित झाले आहेत.

उर्वरित ५६६ कर्मचा-यांपैकी काही महिला कर्मचारी गरोदर असून काही स्तनदा माता आहेत. तसेच इतर पोलीस कर्मचा-यांना गंभीर आजार असून डॉक्­टरांच्या सल्ल्यामुळे त्यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. कोरोनाच्या दुस-या लाटेचा सामना करण्यासाठी पोलिसांना फेसमास्क, सॅनिटायझर तसेच प्रतिकार शक्­ती वाढविणा-या विटामीन-सी च्या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे.

पोलिसांकरिता रेमडेसिवीर राखीव
संपूर्ण राज्यात रेमडिसिव्हर इंजेक्­शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपल्या कर्मचा-यांसाठी ५० रेमडिसिव्हरचा इंजेक्­शनचा साठा केला आहे. पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी किंवा पती, मुले आणि आई-वडिल यांना गरज लागल्यास रेमडिसिव्हरच दिले जाते. आता मिळालेल्या साठ्यापैकी १७ इंजेक्­शन वापरण्यात आली आली आहेत. तसेच बाधित आलेल्या कर्मचा-यांच्या संपर्कात सहायक पोलीस आयुक्­त नंदकुमार जिंजण हे आहेत. ज्या कर्मचा-यांना इंजेक्­शन, प्लाझमा किंवा इतर कोणतीही आवश्­यकता असल्यास तात्काळ ते मदत करतात.

 

परप्रांतिय मजुरांनी धरली परतीची वाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या