27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रएका दिवसात १५ हजार १८५ एसटी कर्मचारी हजर

एका दिवसात १५ हजार १८५ एसटी कर्मचारी हजर

एकमत ऑनलाईन

मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसात एसटी महामंडळातील १५ हजार १८५ कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचा-यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. नव्याने हजर होणा-या सर्व कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

एका दिवसात १५ हजार १८५ कर्मचारी हजर
सोमवारी एका दिवसात एसटी महामंडळातील १५ हजार १८५ कर्मचारी हजर होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८२ हजार १०८ कर्मचा-यांपैकी ६१ हजार ६४७ कर्मचारी कामावर हजर आहेत, तर २० हजार ४६१ कर्मचारी कामावर अद्याप येणे बाकी आहेत. प्रशासकीय १२ हजार ६, कार्यशाळा १५ हजार ७८१, चालक २९ हजार ४८५ तर वाहक २४ हजार ८२६ कर्मचारी हजर आहेत.

२२ एप्रिलची डेडलाईन
ऑक्टोबर २०१२ च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचा-­यांचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. महामंडळाने कर्मचा-यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, त्याला न जुमानता कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचा-यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर येण्यास सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या