25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रविदर्भात युवा सेनेच्या दीडशे पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश

विदर्भात युवा सेनेच्या दीडशे पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या युवासेना प्रमुख पदाला आव्हान देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न दिसत असून पूर्व विदर्भातील युवासेनेच्या दीडशे पदाधिका-यांनी मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

पूर्व विदर्भातील युवासेनेच्या महत्त्वाच्या पदाधिका-यांनी राजीनामे दिल्याने ठाकरे गटाला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत श्.िांदे यांनी युवासेनाप्रमुखपद घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या युवासेना प्रमुखपदालाच त्यांनी थेट आव्हान दिले आहे.

एकामागोमाग एक सुरु असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गटाची युवा सेना अधिकाधिक स्ट्राँग होत चालली आहे. शिवसेनेसोबत युवा सेनेवर शिंदे गटाचा दावा स्ट्राँग होत चालला आहे. यानंतर आता पक्षसंघटनेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना थेट रंगला. आता श्रीकांत शिंदे पडद्यामागून सर्व धुरा सांभाळत आहेत. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्याकडे युवा सेनेची कमान हाती दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचं थेट आव्हान आता आदित्य ठाकरेंना दिलं आहे. शिवसेना उभी फुटलेली सर्वांनी पाहिली आता युवा सेना वाचवण्याचे काम आदित्य ठाकरे आणि त्यांच्या इतर सहका-यांवर आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा खोक्यावरून निशाणा साधला. कोण गद्दार आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो पण कारवाई होत नाही. दुसरा एक गद्दार महिलांना शिवीगाळ करतो, पण कारवाई होत नाही. अशा लोकांना पद पदमुक्त करून मंत्रीमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पण कुठेही कारवाई होत नाही. एका गद्दाराच्या राक्षसी महत्वकांक्षामुळे संपूर्ण महाराष्ट्र मागे चालला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्हे तर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की, ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या