26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने १५ हजारांची मदत

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने १५ हजारांची मदत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असेल किंवा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच शेतक-यांना नुकसान भरपाई मिळते. हे निकष शिथिल करून अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. तसेच आपत्तीग्रस्तांना सध्या ५ हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात येते, त्यात वाढ करून १५ हजारांची मदत देण्यात येईल, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, सरकारची मदत तुटपुंजी असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला.

जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विरोधी पक्षाकडून विधानसभेत नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या चर्चेला उत्तर दिले. अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील १८ लाख २१ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे २१ हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. पिकांच्या-नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पूर्वीपेक्षा अधिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी दोन हेक्टर मर्यादेत मदत केली जायची आता ती तीन हेक्टर इतकी वाढवली आहे.

आपत्तीमध्ये तात्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रुपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सगळ््यात महत्वाचे म्हणजे अवघ्या महिना सव्वा महिन्यात सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकही शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. मदत वाटपाबाबत एकही तक्रार येता कामा नये, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे नुकसानीबाबतचे निकष बदलण्याबाबत पंतप्रधान अनुकुल असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करून शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मोबाईल अँपद्वारे पंचनामे
नैसर्गिक आपत्तीत येणारी बाधितांना मदत देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अँपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अँप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

किडीमुळे होणा-या नुकसानीसाठी मदत
गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, किडीमुळे होणा-या नुकसानीसाठीदेखील शेतक-यांना मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
सप्टेंबरपासून ५० हजाराचे अनुदान कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतक-यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, पुरवणी मागण्यात ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या अनुदानाचे वितरण सुरु केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांचा सभात्­याग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्­या उत्­तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. ओला दुष्­काळ जाहीर करण्याची आमची मागणी होती. अतिवृष्­टीग्रस्­त भागातील शेतक-यांच्या मुलांच्या शाळा-कॉलेजची फी देखील माफ केलेली नाही. त्­यामुळे आम्­ही सभात्­याग करत असल्­याचे अजित पवार म्­हणाले. ओला दुष्­काळ जाहीर करा अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्­याग केला.

आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण !
राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणेकिंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल,असे शिंदे यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या