मुंबई : व्हॉट्सअॅप हे सध्या सोशल मीडियातील एक प्रभावी साधन आहे. अगदी कित्येक मैल अंतरावर असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअॅप सर्रास वापरले जाते.
आपल्याला दररोज असंख्य मेसेजेस रोज व्हॉट्सअॅपवर येत असतात. पण नीट माहिती न घेता मेसेज फॉरवर्ड केले किंवा चुकीची माहिती पसरवली तर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात व्हॉट्सअॅपने तब्बल १६ लाखांपेक्षा जास्त अकाउंट्स बॅन केल्याची माहिती आहे.