23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागातील १६ हजार पदे तातडीने भरणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्य विभागातील १६ हजार पदे तातडीने भरणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासणार आहे. रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती.

मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात यावी अशी मागणी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पदे भरल्यानंतर त्याच निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल, असे टोपे यांनी सांगितले.

झाले तर आमचे… नाही तर तुमचे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या