28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रजहाजातील बुडणा-या १९ जणांना वाचविले

जहाजातील बुडणा-या १९ जणांना वाचविले

एकमत ऑनलाईन

१८ भारतीयांचा समावेश, तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी
मुंबई : रत्नागिरी किना-यापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला बुडत असलेल्या जहाजातील १९ जणांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय तटरक्षक दलाने १८ भारतीय आणि ०१ इथिओपियन मास्टरसह १९ जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या वाचवले.

रत्नागिरी किना-­यापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला सकाळी ९ वाजून २३ मिनिटाला जहाज बुडत असल्याची माहिती मिळाली. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. जहाजातून मदतीचा कॉल मिळाल्यानंतर काही मिनिटांतच एमआरसीसी मुंबई कामाला लागली. आयसीजीएस सुजीत आणि आयसीजीएस अपूर्व या परिसरात आणि परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली. परिसरातील इतर व्यापारी जहाजांना सतर्क करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेट आणि नावटेक्स सूचना देण्यात आली. तसेच सीजी प्रगत हेलिकॉप्टर या ऑपरेशनदरम्यान तैनात करण्यात आले.

अ‍ॅस्फाल्ट बिटुमेन ३९११ एमटी वाहून नेणारे जहाज सकाळी ९ च्या दरम्यान अचानक बुडत असल्याचे जहाजावरील क्रू मेंबर्सला निदर्शनास आले. जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे पाहून क्रू ने जहाज सोडून दिले. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील १९ जणांची सुखरुप सुटका केली. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या