32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रकर्जमुक्ती योजनेतून १९ हजार कोटी शेतक-यांच्या खात्यात जमा

कर्जमुक्ती योजनेतून १९ हजार कोटी शेतक-यांच्या खात्यात जमा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य कृषि क्षेत्राच्या सुदृढतेवर अवलंबून आहे असे अधोरेखित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतक-यांच्या कल्याणावर अर्थसंकल्पात भर दिल्याचेही सांगितले. मागील वर्षी सुरु केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आतापर्यंत ३१ लाख २३ हजार शेतक-यांना झाला आहे. त्यांच्या खात्यात १९ हजार ९२९ कोटी रुपयांची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-यांनीही त्याची परतफेड करीत भरपूर मेहनत घेत गेल्यावर्षी राज्याच्या आर्थिक वृद्धीमध्ये मोठा वाटा उचलला.त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतक-यांच्या हिताकडे खास लक्ष दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

शेतक-यांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. शेतमालासंदर्भात व्यवहार अधिक पारदर्शक व्हावा आणि त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एकाही शेतक-याने आत्महत्या करु नये यासाठी सरकारकडून महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही अत्यंत सोपी, सुलभ योजना राबवण्यात आली.कर्जमुक्ती झाल्याने शेतक-यांना नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्गही मोकळा झाला,अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

३ लाखांपर्यंत पीककर्ज शुन्य टक्क्याने देणार
२०१९-२० मध्ये २८ हजार ६०४ कोटी रुपये तर कर्जमुक्तीनंतर २०२०-२१ मध्ये ४२ हजार ४३३ कोटींचे पीककर्जाचे वाटप झाले. अनेकदा पीक कर्जावरील व्याज भरणेही शेतक-यांना अडचणीचे होते. व्याजाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आणि थकबाकीदार होऊ नये यासाठी शासनाने तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेणा-या राज्यातील शेतक-यांना खरीप हंगाम २०२१ पासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकार हे शेतक-यांचे सरकार असून आमच्या सरकारचा त्यांना पाठिंबा असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

लोकसंख्या निम्मी आहे, तर महिला आरक्षण ३३ टक्केच का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या