25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeमहाराष्ट्रसेल्फी घेण्याच्या नादात मासेमारीसाठी गेलेल्या 2 मुलांना आईसमोरच जलसमाधी

सेल्फी घेण्याच्या नादात मासेमारीसाठी गेलेल्या 2 मुलांना आईसमोरच जलसमाधी

एकमत ऑनलाईन

भिवंडी : नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना भिवंडीत घडली आहे. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. मासेमारी करताना सेल्फी काढताना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. शहबाज अन्सारी (वय 24) आणि शाह आलम अन्सारी (वय 22) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. दोघेही मुंबईतील मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमधील रहिवासी होते.

शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ काल सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास भिवंडी येथील कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांची आई देखील सोबत होती. मासेमारी करत असताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरुन तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना पाहून दुसर्‍यानं देखील पाण्यात उडी घेतली.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ दोन्ही सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली. दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईने जीवाचा आकांत केला. त्यानंतर स्थानिक तरुणांनी तातडीने पाण्यात उतरुन शोधकार्य सुरू केले. रात्री साडे सातला शाह आलम याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर रात्री उशीरा शहबाज अन्सारीचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे.

लम्पिस्कीन आजार प्रतिबंधासाठी उपचार शिबिराला सुरवात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या