औरंगाबाद : शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आरोप-प्रत्यारोप काही थांबायचे नाव घेत नाहीत. आतापर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आता थेट कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. असेच काही चित्र औरंगाबादमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीच्या लग्नासाठी मी पैसे दिले असल्याचा दावा केला. खैरे यांच्या याच दाव्याला बोरनारे यांनी उत्तर दिले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबाद दौ-यावर आहेत.
खैरेंकडे पैसे मागायला मी भिकारी नाही : बोरनारे
खैरेंच्या आरोपाला उत्तर देताना बोरणारे म्हणाले की, खैरे यांनी माझ्या मुलीच्या लग्नाला २ कोटी दिले असा आरोप केला. पण त्यांना पैसे मागायला मी काही भिकारी नाही. निवडणूक अर्ज भरताना मी माझी संपत्ती १८ कोटी दाखवली आहे. माझेच चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवडण्ुकीत खर्च केलेले ५० लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे त्यांनी ते परत करावेत, असे बोरणारे म्हणाले.