मुंबई : विक्रोळी येथे लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वरळीत लिफ्ट कोसळून दोघांचा मृत्यू झाला. वरळीतील अविघ्न हाऊस मायानगर येथील इमारतीत ही घटना घडली.
१९ मजल्याची ही इमारत असून पोलिस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. १९ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. परंतु लिफ्ट बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली.