37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रवीजदरात २ टक्के कपात

वीजदरात २ टक्के कपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

नियामक आयोगाने सुनावणीदरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतच्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देणयस सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाटी १० टक्के वीज दर कमी करण्यात आले, तर या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

असे असतील नवे दर
महावितरण : रहिवासी इमारतींसाठी १ एप्रिलपासून १ टक्का, तर बिगर रहिवासींसाठी कंपनी, उद्योगांना २-५ टक्के
बेस्ट : रहिवासी इमारतींसाठी १ एप्रिलपासून ०.१ टक्का, तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योग यांना ०.३-२.२ टक्के
अदानी : रहिवासी इमारतींसाठी १ एप्रिलपासून ०.३ टक्के, तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योग यांना १.४-१.६ टक्के
टाटा : रहिवासी इमारतींसाठी १ एप्रिलपासून ४.३ टक्के, तर बिगर रहिवासी, कंपनी, उद्योगांना १.१-५.८ टक्के दर आकारणी केली जाणार आहे.

दुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या