22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात लम्पीने २० हजार पशुधनाचा मृत्यू

राज्यात लम्पीने २० हजार पशुधनाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात लम्पी आजाराने आतापर्यंत १९ हजार ७७ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य पशुसंवर्धन आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील पशुंची एकूण परिस्थिती पाहण्याकरीता केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून पुढील तीन दिवस ते पाहणी करणार आहेत.

राज्यामध्ये लम्पी आजाराने आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमधील एकूण तीन हजार ६६६ संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला असून बाधित गावांतील एकूण दोन लाख ८२ हजार ५९५ बाधित पशुधनापैकी एकूण दोन लाख पाच हजार ११० पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित पशुधनापैकी १९ हजार ७७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ७२७४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईसाठी १८.४९ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३७.९७ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे ९८.६१% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्त यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्वच्छ गोठा अभियान राबवा
महाराष्ट्रातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक तीन दिवसांच्या दौ-यावर आले आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त यांनी लम्पी रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक जारी
लम्पी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत असून अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ गरजूनी तात्काळ संपर्क साधावा.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या