टँकमधून सीपीआरमधील 15 ठिकाणी ऑक्सिजन बँकेत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार : पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार
कोल्हापुर : कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड पाठोपाठ आता ऑक्सिजन टॅंकची व्यवस्था करण्यात आली आहे. या ऑक्सिजन टँकची क्षमता वीस हजार लिटर असुन यातुन दिवसाला 450 रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार आहे.
ऑक्सिजनची तत्काळ सोय व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेत जिल्हा नियोजन समितीमधून 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा. लि.कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे. सध्या पाईप जोडणीचे काम सुरु असून शनिवारपर्यंत यातुन ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होईल असे सीपीआर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज 30 फूट उंच आणि 2 मीटर व्यासाच्या या लिक्विड टँक सोबतच 400 क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. हा टॅंकर 20 हजार लीटर क्षमतेचा असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमधील 15 ठिकाणी ऑक्सिजन बँकेत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात येणार आहे.
जागर अस्मितेचा या मोहिमेचा शुभारंभ