24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्र22 दिवसांची चिमुरडी आणि 80 वर्षीय महिला कोरोनामुक्त

22 दिवसांची चिमुरडी आणि 80 वर्षीय महिला कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

 पुणे  : पुणे शहरात कोरोनाचे रोज रुग्ण वाढत असताना शुक्रवारी पुणेकरांसाठी एक ‘ गुड न्यूज’ समोर आली आहे. ससूनमध्ये उपचार घेणारी हडपसर येथील 22 दिवसांची चिमुरडी आणि पर्वती येथील 80 वर्षीय महिला या दोघी कोरोनामुक्त झाल्या आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेला मधुमेहचाही त्रास होता. तरीही या संकटावर मात करून त्या कोरोनमुक्त झाल्या. या जेष्ठ महिलेवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे महापौरांनी आभार मानले.पुणे शहरात कोरोनाचे 11 हजारांच्या वर रुग्ण गेले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.अशा संकटाच्या काळात 22 दिवसांची चिमुरडी आणि 80 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे काहीही कारण नाही. वेळीच उपचार, काळजी घेतल्याने कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो, हे अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.

पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, डॉकटर, नर्सेस, महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे.त्यामुळे पुणेकरांनी या रोगाला न घाबरता त्याचा सामना करण्याची गरज आहे. सध्या कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत.

Read More  चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या