19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिका कर्मचा-यांना घसघशीत २२५०० रुपये बोनस जाहीर

मुंबई महापालिका कर्मचा-यांना घसघशीत २२५०० रुपये बोनस जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महापालिकेच्या कर्मचा-यांसाठी खूशखबर असून त्यांना तब्बल २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि बीएमसी कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यामध्ये बुधवारी बोनसबाबत बैठक झाली, यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय झाला.

या बैठकीत युनियनने कामगारांचे विविध मुद्दे मांडले. यावेळी कर्मचा-यांना २० ते २५ हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी यावेळी युनियनकडून करण्यात आली होती. पण या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊन चर्चा करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी युनियनला दिले होते.

दरम्यान, कमाल २५ हजार रुपयांच्या बोनसची मागणी मान्य झाली नसली तरी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुवर्णमध्ये साधला आहे. त्यानुसार २२,५०० रुपयांचा बोनस प्रत्येक कर्मचा-यासाठी जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत सध्या साडेचारशे कंत्राटी कामगार असून त्यांना बोनस लागू होत नाही. पण मुंबई महापालिकेशिवाय इतर महापालिकांमधील कंत्राटी कामगारांना मात्र बोनस दिला जातो, या धर्तीवर बीएमसीच्या कर्मचा-यांना देखील बोनस मिळावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या