16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रश्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता २४ तास दर्शन

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता २४ तास दर्शन

एकमत ऑनलाईन

निमित्त कार्तिकी यात्रेचे, वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय
पंढरपूर : कार्तिकीवारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेता श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन सुलभ आणि तत्पर व्हावे, यासाठी शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर २०२२ पासून ‘श्री’ चे दर्शन २४ तास सुरु ठेवण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

कार्तिक शुद्ध एकादशी सोहळा ४ नोव्हेबर २०२२ रोजी होणार असून, या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे ८ ते १० लाख भाविक येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून मंदिर प्रशासनाकडून चांगला दिवस पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांसाठी २८ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २४ तास दर्शन सुरु ठेवण्यात आले असल्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.

सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपूजेपर्यंत (दि.१३ नोव्हेंबर) बंद राहतील. या कालावधीत श्री ची नित्यपूजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराच्या वेळा वगळता श्रींचे पददर्शन २२.१५ तास सुरु राहील, तर मुखदर्शन २४ तास सुरू राहील .

श्री चे दर्शन २४ तास सुरु केल्याने आता दररोज सुमारे ३५ ते ४० हजार भाविकांना पददर्शन तर सुमारे ४० ते ४५ हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत श्री चे २४ तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी अवधीत दर्शन होणार असल्याचे मंिदर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
यावेळी मंदिर समितीचे सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), अ‍ॅड. माधवी निगडे, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख श्री पांडूरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या