34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रअठरा तासांत तब्बल २५.२४ किलोमीटरचा महामार्ग; 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'साठी प्रस्ताव

अठरा तासांत तब्बल २५.२४ किलोमीटरचा महामार्ग; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर २५.५४ किमीचा रस्ता केवळ १८ तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे. यासाठी ५०० मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

हा महामार्ग ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH५२ म्हणून ओळखला जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहेत.

यापूर्वी गुजरात राज्यात २४ तासांत १० किमी महामार्ग तयार झाल्याची नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच गुजरात येथील पटेल कंपनीने ही कामगिरी केली आहे. हैदराबाद येथील आयजेएम कंपनीने सोळा तासांत १२.७७ किलोमीटर महामार्ग तयार करून नव्या कामगिरीची नोंद दर्शवली आहे.२५ इंजिनिअर आणि ४५० कर्मचारी या कामासाठी २५ इंजिनिअर व ४५० कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत काम सुरू होते. पाच पेव्हर मशीन, पंधरा रोलर आणि इतर मशिनरी तैनात होत्या.

दहावी, बारावीची परीक्षा रद्द केलेल्या नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या