21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रअभ्यासक्रमात २५ टक्के कपात

अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरू न करता आल्याने वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तसेच तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावे, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा सुरु करता आल्या नाहीत. वेळेत शाळा सुरु करता न करता आल्यामुळे विहीत वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होवू शकते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता पहिली ते बारावीचा पाठ्यक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करण्याबाबत शासनाचे विचारमंथन सुरु होते. सध्यातरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याने शासनाने यावर्षी देखील २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लवकरच जाहीर करणार आहे. याबाबत सहसचिव राजेंद्र पवार यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे, तर अभ्यासक्रम कपात हा तात्पुरता उपाय असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी होणा-या प्रवेशपूर्व परीक्षेत या अभ्यासक्रम कपातीमुळे अडचणी येतील, असे शिक्षकांनी म्हटले आहे.

भाविकांच्या मिनीबसला आयसरची धडक; ४ ठार, ३ गंभीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या