28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्र३ खासदार, ८ आमदार शिंदेंच्या संपर्कात

३ खासदार, ८ आमदार शिंदेंच्या संपर्कात

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडीना वेग आला. दरम्यान एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर ठाकरे गटातूनच नाही तर इतर पक्षातूनही शिंदे गटात इन्कंिमग सुरू आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता ठाकरे गटाचे ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात येतील असा दावाच खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

निवडणूकीच्या तोंडावर ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात १०० टक्के येतील असा दावा जाधव यांनी केला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यानंतर आता आणखी ३ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा जाधव यांच्याकडून केला जातो. ते बोलताना म्हणाले की, आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहेत. जशा निवडणुका जवळ येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल असा दावाच प्रतापराव जाधव यांनी यावेळी केला आहे.

खा. जाधव यांनीही केला होता गौप्यस्फोट
खासदार प्रतापराव जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरच काही दिवसांत खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या