29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रवसईतील स्फोटात ३ कामगार ठार

वसईतील स्फोटात ३ कामगार ठार

एकमत ऑनलाईन

पालघर : वसईतील पूर्व भागातील जुचंद्र वाकीपाडा येथील कॉस पावर कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ७ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही दुर्घटना अतिशय भयानक होती. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनीतील यंत्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

वाकीपाडा येथे झालेला स्फोट हा खूप मोठा होता. या स्फोटामुळे परिसराला मोठा हादरा बसला होता. हा स्फोट इतका भयानक होता की, एक किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. या आवाजामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमके काय घडले ते कुणाच्याच लक्षात येत नव्हते. सुरुवातीला आग लागल्याचे बोलले जात होते. नंतर कंपनीत स्फोट झाल्याचे उघड झाले.

वाकीपाडा येथील कंपनीत स्फोट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. स्फोटानंतर धुराचे मोठमोठे लोळ आकाशात जाताना दिसत होते. स्फोटानंतर तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच घटनास्थळी अग्निशन दलाचे जवान, पोलिस दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. पण या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या