27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावतीच्या 3 तरुणांचा मध्यप्रदेशातील धाराखोरा डोहात बुडून मृत्यू

अमरावतीच्या 3 तरुणांचा मध्यप्रदेशातील धाराखोरा डोहात बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

अमरावती | पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या अमरावती शहरातील तीन युवकांचा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश मधील धाराखोरा येथील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. दीपक मिश्रा, आशिष कोटेचा आणि विनय कुशवाह अशी डोहात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाची नावे आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे अमरावती मधील तरुण हे मोठया प्रमाणावर पर्यटनासाठी मेळघाटात जात असतात.

अशातच अमरावती व बडनेरा मधील 6 तरुण हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ते परतवाडा धारणी मार्गावरील परतवाडा

पासून 15 किलोमीटर असलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीतील धाराखोरा डोहात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दीपक मिश्रा, आशिष कोटेचा व विनय कुशवाह या तीन जीवलग मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तिन्ही मित्र जीवलग असल्यानं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Read More  तांत्रिकांच्या सांगण्यावरून वडिलांनी 5 मुलांची केली हत्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या