30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली

एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली

एकमत ऑनलाईन

मुंबई: करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरोना नियमाचे पालन नीट केले जाते का यावर महापालिकेकडून नजर ठेवली जात असून, विविध ठिकाणी धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, महापालिकेकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन सातत्यानं केलं जात असताना चेंबूर परिसरात आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महापालिकेने नवरदेव-नवरीच्या आईवडिलांसह लग्न आयोजित करण्यात आलेल्या जिमखान्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चेंबूरमधील छेडानगर जिमखाना येथे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते़ विवाह सोहळ्यासाठी २०० जणांची मर्यादा महापालिकेने ठरवून दिलेली आहे. त्याचबरोबर मास्क वापरणंही बंधनकारक केलेलं आहे. मात्र, विवाहस्थळी २०० पेक्षा अधिक गर्दी असल्याचे दिसून आले़ त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही सर्रासपणे भंग करण्यात आल्याचं आढळून आले़ याप्रकरणी महापालिकेने नवरदेव-नवरीच्या आईवडिलांसह जिमखान्याविरुद्ध महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली
मुखपट्टी न लावणाºयांविरोधात पालिकेने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (२० फेब्रुवारी) एका दिवसात १६ हजार १५४ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली केली. उपाहारगृहे, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली. करोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाºयांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. मुखपट्ट्या न लावणाºया १६ हजार १५४ जणांवर प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली करण्यात आली.

 

जिल्ह्यात ५९ कोरोनाचे रूग्ण वाढले; एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या