24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये देशातील मुठभर अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ

लॉकडाऊनमध्ये देशातील मुठभर अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात गेल्यावर्षी केलेल्या टाळेबंदीने किती जणांचा बळी गेला, नोकºया गेल्या, किती विस्थापित झाले याची मोजदादही करणे अशक्य असले तरी भयानक चित्र समोर आले आहे. देशातील अब्जाधीशांना टाळेबंदी मंदीत चांदी करून देणारी ठरली आहे. कोरोना व्हायरसने भारतातील अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल कामगार, गरीब, पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील उत्पन्नाने आणखी दरी रुंद केली आहे. नॉन प्रॉफिट ग्रुप असणाºया आॅक्सफॅमने सोमवारी आपल्या अहवाल संबंधित आकडेवारी सादर केली. दरम्यान ही आकडेवारी स्वीत्झर्लंडमध्ये होणाºया दावोस बैठकीत सादर होणार आहे़

असमानतेचा विषाणू नावाच्या अहवालात म्हटले आहे की कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान भारताच्या अब्जाधीशांची संपत्तीत तब्बल ३५ टक्क्यांनी वाढली आहे, तर देशातील ८४ टक्के कुटुंबांना आर्थिक अडचणीतून जावे लागले. त्याचवेळी, केवळ एप्रिल २०२० मध्ये दर तासाला १७ लाख नोकºया गेल्या. जगभरातील गरिबी दूर होऊ शकते एवढा नफा मार्च २०२० पासून भारताच्या १०० अब्जाधीशांनी निर्माण केलेल्या संपत्तीमधून देशातील गरीब असलेल्या १३ कोटी लोकांना ९४ हजार ४५ रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. अहवालात म्हटले आहे की, भारतात वाढती असमानता कडवट आहे.

एका तासाची कमाई शेकडो कोटींमध्ये
कोरोना लॉकडाऊन काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका तासात जेवढी संपत्ती निर्माण केली आहे़ त्यामध्ये भारतातील एका अकुशल कामगाराला कमावण्यासाठी १० हजार वर्ष लागतील. तसेच त्यांनी जी सेकंदामध्ये केली आहे ती करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल.

आर्थिक विषमता गंभीर
गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये मुकेश अंबानी जगातील चौथा श्रीमंत व्यक्ती ठरले होते. अचानक लॉकडाऊननंतर लाखो स्थलांतरित कामगारांना रोजगार, बचत आणि निवारा गमावला आणि त्यांना आपल्या गावात परत जाण्यास भाग पाडले गेले. त्यावेळी आपण शेकडो किलोमीटर चालत्या कामगारांना पाहिले तेव्हा वेदनादायक चित्रे समोर आली होती.

लातूरकरांनी दिलेले प्रेम कायम आठवणीत राहीलः जी.श्रीकांत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या