27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रभुसावळमध्ये ३५० पोपटांना जीवदान

भुसावळमध्ये ३५० पोपटांना जीवदान

एकमत ऑनलाईन

जळगाव : भुसावळ तालुक्यात असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री वरणगाव येथे वादळी पावसाने तडाखा दिला. या ठिकाणी असलेल्या निलगिरी वृक्षांच्या फांद्या वादळामुळे तुटून पडल्या. यात फांद्यावरील ३०० पोपट मृत्यूमुखी पडले. तर शेकडो जखमी होवून खाली पडले. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत ३५० जखमी पोपटांना जीवदान दिले. उपचार केल्यानंतर या पोपटांना मुक्त करण्यात आले.

वरणगाव येथे वादळी पावसामुळे निलगिरीच्या वृक्षांवरील फांद्याची पडझड झाली. या वृक्षांवर शेकडो पोपट होते. वादळी पावसामुळे शेकडो पोपट झाडावरून पडू लागले. यात सुमारे ३०० पोपटांचा मृत्यू झाला. जखमी व मृत पोपटांना मोकाट श्वान व मांजरी घेवून गेल्या. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र निशांत रामटेके यांना माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या