30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आज ३ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त

महाराष्ट्रात आज ३ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात आज ३ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात ३ हजार ५०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर मागील २४ तासांमध्ये ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २७ लाख ४७ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३२ हजार ११२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा सध्या २.५६ टक्के इतका आहे. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ५२ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात ३ हजार ५०९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ३२ हजार ११२ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या ५८ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत असेही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे़

मागण्या मान्य होईपर्यंत नववर्षाचे स्वागत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या