मुंबई : दुबईवरून परतणा-या एका ३९ वर्षीय इसमाकडे विमानतळावर तब्बल ४.५ किलो सोने आढळले आहे. या महाभागाने अंडरवेअरमध्ये सोने लपविले होते. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतले.
सदरील बिहारी तरुणाने दुबईवरून आणलेल्या साडेचार किलो सोन्याची किंमत २.३ कोटी रुपये इतकी आहे. त्याने त्याच्या जीन्सच्या आतमध्ये पॉकेट बनवून त्यात सोने लपवले होते. शिवाय अंडरवेअरमध्येही सोने दडविले होते.