23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रराज कुंद्राच्या कंपनीतील ४ कर्मचारी मुख्य साक्षीदार!

राज कुंद्राच्या कंपनीतील ४ कर्मचारी मुख्य साक्षीदार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रांना अटक केली. या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली. राज कुंद्रा हेच या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. यासंबंधीचे पुरावेही मिळाले आहेत. आता तर कंपनीतील ४ कर्मचारीच या प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी ही माहिती दिली.

पॉर्न चित्रपट निर्मिती आणि अ‍ॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. या पॉर्न चित्रपट प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. तसेच विआन आणि दुस-या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली आहे. या कार्यालयात पोलिसांना एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली. दरम्यान, मुंबई पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणात राज कुंद्रा यांचेच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत.

राज कुंद्रा आणि इतर आरोपी चौकशीत पुरेसे सहकार्य करत नाहीत. मात्र, आता कंपनीतीलच चार कर्मचारी मुख्य साक्षीदार बनण्यास तयार आहेत. हे चार कर्मचारी या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

घराचीही घेतली झाडाझडती
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या अंधेरीतील घरावर २३ जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकून अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चौकशी केली. जबाब नोंदवला. यावेळी घराची झाडाडती घेण्यात आली. पोलिस अधिका-यांना त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. त्यातच घरात काही गुप्त कपाटही आढळून आली असल्याची माहिती समोर आली.

राज-शिल्पाच्या संयुक्त खात्यात विदेशातून पैसा
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या संयुक्त बँक खात्यात अफ्रिका आणि लंडनहून मोठी रक्कम वर्ग केल्याचे आढळून आले आहे. ही माहिती आयकर विभागापासून लपविली आहे. त्यामुळे आता या आर्थिक व्यवहारासंबंधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करू शकते. ईडी कुंद्राविरोधात मनी लॉन्ड्रिंग आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट अंतर्गत कधीही गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

शोधमोहीम थांबविली; तळीयेत ८२ मृत्युमुखी, ५० मृतदेह बाहेर, अद्याप ३२ बेपत्ताच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या