24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रउल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ ठार

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ ठार

एकमत ऑनलाईन

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. इमारतीचा स्लॅब दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगा-याखाली आणखी काहीजण काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

उल्हासनगरमध्ये मानस टॉवर ही चार मजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला. तीन दिवसांतील स्लॅब कोसळल्याची दुसरी मोठी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या ठिकाणी ढिगा-याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर अग्निशमन दल, पोलिस प्रशासनाच्या वतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, सातत्याने या दुर्घटना होत असताना शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवर तोडगा कधी निघणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या