27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा, १ हजार गाव व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा, १ हजार गाव व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

एकमत ऑनलाईन

मुंबई : विजेच्या टंचाईवर मार्ग काढण्यात यश आल्याने भारनियमनाच्या संकटातून दिलासा मिळाला असला तरी, उन्हाची काहिली वाढत चालल्याने आता अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जवळपास २८१ गावे, ७३८ वाड्यांना सध्या २७० टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. आजमितीला राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ४१.१९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तुलनेत यंदा (३९.९२ टक्के) यंदा थोडा अधिक पाणीसाठा आहे. तसेच यंदा मान्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असल्याने फारशी अडचण येणार नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून, २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

या आठवड्यात गावांच्या संख्येमध्ये ६८ ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येत १७५ ने वाढ झाली आहे. टँकर्सच्या संख्येतही ८३ ने वाढ झाली. यामध्ये ५७ शासकीय व २१३ खासगी अशा एकूण २७० टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी आजच्या स्थितीला राज्यात ३५६ गावे, ७३४ गावांना संख्या २७७ टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

विभागनिहाय पाणीसाठा
राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्याची विभागनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे (कंसात २०२१ मधील टक्केवारी)
अमरावती : ५०.०८ टक्के (४७.२५)
औरंगाबाद : ५०.१५ (४२.६०)
कोकण : ४७.९६ (४७.६२)
नागपूर : ३७.३९ (४४.२७)
नाशिक : ४१.०४ ( ४३.५९)
पुणे : ३४.११ (३२.१२ टक्के)

महसूल विभाग निहाय टँकरची संख्या
टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या गावे, वाड्या आणि टँकर्सची संख्या महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे
अमरावती : गावे ४१, वाड्या- निरंक, टँकर्स-४१ औरंगाबाद : गावे १४, वाड्या-१, टँकर्स-२४ कोकण : गावे १११, वाड्या-३६६, टँकर्स-७८ नाशिक : गावे ७३, वाड्या-८६, टँकर्स-७२ पुणे : गावे ४२, वाड्या-२८५, टँकर्स-५५
नागपूर विभागात कोणतेही गाव किंवा वाडी-वस्तीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या