24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्र४४ कारखाने लाल यादीत

४४ कारखाने लाल यादीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारने साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या बाबतीत जाहीर आणि ठोस भूमिका घेतली आहे. शेतक-यांची फसवणूक करणा-या ४४ कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शेतक-यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतक-यांची फसवणूक करणे असे विविध आरोप संबंधित कारखान्यांवर लावण्यात आले असून या कारखान्यांना लाल यादीत समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी माजी राजकीय पुढारी या कारखान्याचे संचालक आहेत.

संबंधित कारखान्यांवर शेतक-यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतक-यांची फसवणूक करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथून पुढे शेतक-यांनी संबंधित कारखान्यांना ऊस घालताना ही यादी लक्षात ठेवावी, असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. राज्यातील अनेक पुढा-यांचा संबंधित कारखान्यांशी संबंध आहे. पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, समाधान औताडे, भालके, विजयसिंह मोहिते पाटील अशा दिग्गज नेत्यांचे कारखानेदेखील लाल यादीत समाविष्ट केले आहेत. आयुक्तांकडून शेतकरी हिताची भूमिका घेतल्याने शेतकरी संघटनांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लाल फुली मारलेले हे आहेत कारखाने
सिद्धेश्वर सहकारी, कुमठे, संत दामाजी, मंगळवेढा, विठ्ठल सहकारी, गुरसाळे, पंढरपूर, मकाई करमाळा, लोकमंगल अ‍ॅग्रो, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे, सिद्धनाथ शुगर, तिहे, सोलापूर, गोकुळ शुगर धोत्री, सोलापूर, मातोश्री लक्ष्मी, सोलापूर, जयहिंद शुगर, आचेगाव द. सोलापूर, विठ्ठल रिफाईन्ड, पांडे, करमाळा, गोकुळ माऊली शुगर तडवळ, अक्कलकोट, भीमा सहकारी, टाकळी सिकंदर, मोहोळ, सहकार शिरोमणी, भाळवणी, वैद्यनाथ सहकारी सा. का. परळी, वैद्यनाथ परळी-पंकजा मुंडे, लोकमंगल सोलापूर, सुभाष देशमुख यांचे ३ कारखाने, एच जे शुगर, रावळगव, जयंत पाटील शेकाप, दामाजी शुगर, समाधान औताडे यांच्या साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी लाल यादीत समावेश केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या