24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई एअरपोर्ट जवळच्या ४८ इमारती होणार जमीनदोस्त

मुंबई एअरपोर्ट जवळच्या ४८ इमारती होणार जमीनदोस्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवती असलेल्या टोलेजंग इमारती पाडल्या जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ४८ उंच इमारतींचा भाग पाडण्याचे निर्देश मुंबई जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. ठराविक उंचीच्या वरचा भाग ऑर्डरनुसार पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठने ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले त्या इमारांतीचे वीज-पाणी सेवा पुर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालय अधिवक्ता यशवंत शेनॉय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी करण्यात आली आहे. त्यात मुंबई विमानतळाजवळील उंच इमारतींमुळे निर्माण होणा-या धोक्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सांगितले की, या संदर्भात वेळोवेळी सर्वेक्षण केले जाते. २०१० मध्ये एकूण १३७ अडथळ्यांच्या इमारतींची ओळख पटली. त्यापैकी १६३ प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ इमारती तत्काळ पाडण्याची गरज आहे कारण त्यांच्या वतीने कोणतेही अपील दाखल करण्यात आलेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या