26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईत ड्रग्स पेडलरसह ५ जण अटकेत

मुंबईत ड्रग्स पेडलरसह ५ जण अटकेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मोठ्या अंमलीपदार्थासह अंमलीपदार्थ पुरविणा-या आणि इतर ४ असे एकूण ५ जणांना रविवार दि़ ८ नोव्हेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ताब्यात घेतल्याने एनसीबीला मोठे यश आले आहे. बॉलिवूडमधील मोठे ड्रग्स प्रकरण समोर आले असून, या प्रकरणाची पाळमुळे शोधण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईसह महाराष्ट्रात धडक कारवाई सुरू केली आहे . मुंबईत एनसीबीने रविवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ किलो गांजासह एमडी आणि एलएसबी ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. तर एनसीबीने ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात १ ड्रग्स पॅडलर तर ४ सप्लायर्सचा समावेश आहे. कारवाईत ३ एसयूव्ही गाड्या देखील भी जप्त केल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता एनसीबीच्या रडावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हे निर्माते आणि दिग्दर्शकांकडे एनसीबीच्या छापेमारीस सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रभर ही छापेमारी सुरू असून, यामध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

छापेमारी अद्याप सुरूच
मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी रात्री छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीने या निर्माते आणि दिग्दर्शकांची नावे उघड करण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरातून काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत, शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली छापेमारी अद्यापही सुरू आहे.

ड्रग्स पेडर्लसी चौकशी सुरू
एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नावे समोर आली आहेत. त्या नावांच्या आधारेच एनसीबीने ही छापेमारी केली आहे. या पेडलर्सच्या जबाबाच्या आधारे अद्याप एनसीबीकडून कारवाई सुरू आहे.

सुरक्षा रक्षक कामगारांवर ऐन दिवाळीत शिमग्याची वेळ; तीन महीने उलटूनही पगाराचा पत्ता नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या