34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र उद्यापासून धावणार राज्यात ५ रेल्वेगाड्या

उद्यापासून धावणार राज्यात ५ रेल्वेगाड्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेत बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच राज्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने आज बुधवार दि. ७ ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातंर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यास मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात परवानगी दिली होती. त्यानंतर पाच जिल्ह्यांदरम्यान विशेष रेल्वे गाड्याा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

राज्य सरकारने ३० सप्टेंबर रोजी मिशिन बिगिनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना राज्यातील रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अखेर पाच शहरांदरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईसह नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूरचा समावेश
९ ऑक्टोबरपासून रेल्वेसेवा सुरू होणार असून, दररोज दोन्ही बाजूंकडून पाच स्पेशल ट्रेन धावणार आहे. या रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, पुणे, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांच्या दरम्यान धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

हाती धुपाटणेच!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या