मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ््या प्रकरणी तेलगीचा सहकारी शब्बीर शेखला मुंबई सत्र न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणात ५ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपरच्या छपाई आणि वितरित करण्याच्या आरोपात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीला शिक्षा सुनावल्यात आली. हा निर्णय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष अतिरिक्त न्यायाधीश सुनील यू हेक यांनी दिला.
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणात २००९ मध्ये आरोपी शब्बीर शेख आणि तेलगीविरुद्ध वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी शब्बीर शेख दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला ५ वर्षांची शिक्षा आणि १६००० रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या संदर्भातील सविस्तर सहा पानाची ऑर्डर मुंबई सत्र न्यायालयातील वेबसाईटवर उपलब्ध करून घेण्यात आली आहे.
फिर्यादी खटल्यानुसार दोघांवर गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शब्बीर शेखने बनावट महसूल शिक्के तयार केले. शेख जो तेलगीचा जवळचा सहकारी होता. आरोपी शब्बीर शेख २००२ ऑक्टोबरपासून तुरुंगात होता तर या घोटाळ््यातील मास्टरमाईंड तेलगीचा ऑक्टोबर २०१७ मध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता. सध्याच्या प्रकरणात पोलिसांनी २०१४ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.