24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रआरोग्‍य विभागातील ५० टक्‍के पदे एक महिन्यात भरणार ! -राजेश टोपे यांची...

आरोग्‍य विभागातील ५० टक्‍के पदे एक महिन्यात भरणार ! -राजेश टोपे यांची घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या स्थगितीसह काही अडचणी असल्या तरी येत्या महिनाभरात आरोग्‍य विभागातील ५० टक्‍के रिक्त पदे परीक्षा घेउन भरण्यात येतील, अशी घोषणा आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. कोरोनवरील लसीला केंद्राची परवानगी मिळताच, निवडणुकीच्या मतदानाप्रमाणे बूथ उभारून लसीकरणाची मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदं लगेच भरण्यात येतील अशी घोषणा केली. मराठा आरक्षणाला स्थगिती आल्याने अडचण होती. परंतु हा निर्णय येईपर्यंत अर्धीच पदं सध्या भरण्यात येतील. ही भरती रीतसर परीक्षा घेऊन केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाची स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच चांगली असल्याचे सांगितले. कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. रिकव्हरी रेटही ९४ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कोरोनाच्या चाचणीचे दर आणखी दोनशे रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मास्क व औषधांच्या किमतीवर आपले नियंत्रण आहे. कोरोनाच्या तब्बल ८३ टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून खाजगी रुग्णालयात घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करणे भाग पाडण्यात आले आहे. धारावी आणि मालेगाव येथील परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आली. धारावीतील प्रभावी नियंत्रणाची जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रशंसा केली असल्याचे टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकारने सप्टेंबरपासून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आर्थिक मदत देणे बंद केले आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी आपले वजन वापरून ही मदत मिळवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

भौतिक विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विषयावर ई-आंतरराष्ट्रीय परिषद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या