24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रदहिसरमधून ५७ वर्षीय संशयित ताब्यात

दहिसरमधून ५७ वर्षीय संशयित ताब्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिसरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा एक फोन कॉल आला होता. याची तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली.

तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. दहिसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयित आरोपी ५७ वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात याआधीदेखील आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या