34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्र६ महिन्यांच्या तीरा कामतला अखेर मिळालं १६ कोटींचं औषध

६ महिन्यांच्या तीरा कामतला अखेर मिळालं १६ कोटींचं औषध

एकमत ऑनलाईन

मुंबई : SMA या आजाराने पीडित असलेल्या ६ महिन्यांच्या तीरा कामतला उपचारासाठी लागणारे १६ कोटी रुपयाचे इंजेक्शन मिळाले असून डॉक्टरांनी काल तीराला औषध दिलं आहे. तिला माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय. तीराला शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचं कळतंय.

अमेरिकेतून तीराचं देण्यात येणारं १६ कोटी रुपयाचे औषध गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात पोहचलं. हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे तेथून परवाना मिळाल्यानंतरच हे औषध तीराला सलाईनमधून देण्यात आलं. आता एक दिवस तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. औषध मिळाल्याने ती लवकरच बरी होईल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. अनेकांनी तिची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्यात.

SMA या आजाराने ग्रासलेल्या 5 महिन्यांच्या तीरा कामतच्या मदतीसाठी आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकार देखील धावून आलं. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा 6 कोटींचा कर माफ केला होता. त्यामुळे हे औषध भारतात आणण्यास मोठी मदत झाली. स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या