22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रभुजबळांच्या मुंबई कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह

भुजबळांच्या मुंबई कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ होम क्वारंटाइन, अन्न,नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई दि.१२ सप्टेंबर :-राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या