28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग अद्याप वाढत असला तरी, रूग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ६० हजार २२६ रूग्णांनी करोनावर मात केली, तर ४८ हजार ४०१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ५७२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. शिवाय, वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाउनचा कालावधीदेखील वाढवला गेला आहे.

याचबरोबर केंद्रातील तज्ज्ञांनी करोनाच्या तिस-या लाटेचादेखील धोका वर्तवला असल्याने आरोग्ययंत्रणा अधिकच सक्रीय झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४४,०७,८१८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत राज्यात ७५ हजार ८४९ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

देशात चौथ्या दिवशीही ४ हजारांवर कोरोना बळी
कोरोनाच्या दुस-या लाटेचा उद्रेक थांबवण्यासाठी उशिराने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचे दृश्य देशभरात दिसत आहे. उद्रेक झाल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांनी नाईट कर्फ्यू, कडक निर्बंध, लॉकडाउन आदी प्रतिबंधात्मक उपाय लागू केले असले, तरी कोरोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ देशात ४ हजार ९२ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या आता २ लाख ४२ हजार ३६२ वर जाऊन पोहोचली आहे.

मराठवाड्यात संसर्गाचा आलेख उतरता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या