25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात २४ तासांत आढळले ६०,२१२ रुग्ण; २८१ रुग्णांचा मृत्यू

राज्यात २४ तासांत आढळले ६०,२१२ रुग्ण; २८१ रुग्णांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने मंगळवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. राज्यात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल ६०,२१२ रुग्ण आढळून आले असून, २८१ रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.

राज्यात आज ६०,२१२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३१,६२४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २,८६,६०९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५,९३,०४२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात २८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण ५८,८५२ लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.४४% झाले आहे. तर पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात १०,११२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून तब्बल ९९ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या अंधारी, निर्मनुष्य रस्त्यावर प्राण्यांची सेवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या