30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रबावधनच्या बगाड यात्रेनंतर ६१ जण पॉझिटिव्ह

बावधनच्या बगाड यात्रेनंतर ६१ जण पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

सातारा: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. अशापरिस्थितीत चिंतेत वाढ म्हणजे सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा चांगलीच महागात पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस असे एकूण ६१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

ही यात्रा झाल्यापासून गावातील तब्बल ६१ जण पॉझिटिव्ह आढळले गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा मानली जाते. यात्रेदरम्यान कोरोनाच्या नियामांचं पालन न करणा-या पोलिसांनी ८३ जणांवर अटकेची कारवाई देखील केली. या बाधित रुग्णांमुळे बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्ये कोरोनाचा आकडा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाच्या आदेशानं वाई तालुक्यातील काळुबाईची यात्रा, कराड तालुक्यातील पालच्या खंडोबाची यात्रा अशा मोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून ग्रामस्थांनी साजरी केली होती. बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे ८ पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे वाई तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबादेत रुग्णालये हाऊसफुल्ल; सोमवारी ६८० रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या