22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ६३,२९४ नवे रुग्ण

राज्यात ६३,२९४ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे़ आज राज्यात कधी नव्हे ते ६३,२९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ३४९ कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे़

सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.७ टक्के एवढा आहे. राज्यात ६३,२९४ नवे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,६५,५८७ एवढी झाली आहे़ तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३४,०७,२४५ झाली आहे़ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे आणि औरंगाबाद, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांतील परिस्थिती बिघडलीय. अनेक रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी बेडच मिळत नाही आहेत़ तर अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता भासतेय. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमधल्या स्मशानभूमीत रुग्णांना अग्नी देण्यासाठी रांगा लागण्याचे चित्र निर्माण झाले आहे़

८ दिवसांचा लॉकडाऊन लावावा, मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज टास्क फोर्सची बैठकही घेतली आहे़या बैठकीत ८ दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे़ तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान १४ दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असे मत मांडले आहे़ त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रतिसाद मिळत नसलेले लसीकरण सेंटर्स हलवणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या