29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळावर ७.६ किलो हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळावर ७.६ किलो हेरॉईन जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने सीएसएमआय विमानतळावर मोठी करवाई केली आहे. अदिस अब्बा येथून प्रवास करणा-या प्रवाशाकडून ७.६ किलो हेरॉईन जप्त केले. याचे बाजारमूल्य ५३ कोटी रुपये आहे. आरोपींना १० मार्चपर्यंत कोठडीत सुनावण्यात आली आहे. पुढील तपास डीआरआय करत आहे. काल ७ मार्चलादेखील मालवणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५२ लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी १३० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

या अगोदरच्या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर भालेराव, पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक मालाडच्या मालवणी परिसरात गस्त घालत होते. या वेळी या पथकाला एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १३० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि तीन ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जचीकिंमत ५२ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. तपासात त्याने तो ड्रग्जची विक्रीसाठी तिथे आल्याची कबुली दिली. त्याच्याकडील ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलीस शिपाई सचिन वळतकर यांच्या तक्रारीवरुन लालामोहम्मद शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या