30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्र७ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

७ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

एकमत ऑनलाईन

वसई:कोरोना रुग्णसंख्येच्या स्फोटक वाढीचा भार आरोग्य व्यवस्थेला अस होत असल्याचे चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत असून, अनेक ठिकाणी रुग्णांना बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपा-यात घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

वसई विरारमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, सोमवारी ऑक्सिजनअभावी ११ रुग्णांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात नालासोपा-यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्ण ऑक्सिजन न मिळल्याने मरण पावले आहेत. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयील ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देता आला नाही आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणीही रुग्णांची हेळसांड
प्रचंड वेगानं वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या महानगरांसह सातारा उस्मानाबाद आणि जिल्ह्याच्या ठिकाणीही रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी फरफट होत असून, बेड उपलब्ध नसल्याने मिळेल त्या जागेवर उपचार केले जात आहेत. साता-यात महिलेवर रिक्षातच उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता.

निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवा – राजेश टोपे यांचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या