33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र दुपारी पाचपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांत ७९ टक्‍के मतदान !

दुपारी पाचपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांत ७९ टक्‍के मतदान !

२ लाख १४ हजार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, १८ तारखेला फैसला

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींपैकी १२ हजार ७७६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी तुरळक अपवाद वगळता राज्‍यातील ग्रामपंचायतींसाठीचे मतदान सुरळित पार पडले. दुपारी साडेतीनपर्यंत ७९ टक्‍के मतदान झाले होते.२ लाख १४ हजार ८८० उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून त्यांच्या भवितव्याचा १८ तारखेला फैसला होणार आहे.

सकाळी सात वाजल्‍यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.१२ हजार ७७६ ग्रामपंचायतींच्या साठी हे मतदान पार पडले.एकूण प्रभाग ४६ हजार ९२१ होते.१ लाख २५ हजार ७०९ जागांसाठी ३ लाख ५६ हजार २२१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते.त्‍यातील ६ हजार २४ अर्ज अवैध ठरले.३ लाख ५० हजार १९७ अर्ज वैध ठरले होते.९७ हजार ७१९ अर्ज मागे घेण्यात आले.तर २६ हजार ७१८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.निवडणूक रिंगणात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार होते.त्‍यांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. १८ तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

यावेळच्या निवडणुकांत सरपंचपदाच्या लिलावाचा मुददा देखील गाजला. नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे.

तिढा सुटायचा तर…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या