38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeमहाराष्ट्रटिंबर मार्केटला लागलेल्या आगीत ८ कुटुंब उद्ध्वस्त

टिंबर मार्केटला लागलेल्या आगीत ८ कुटुंब उद्ध्वस्त

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली होती. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तर जवळच्या शाळेतील बाकं आणि मुख्यध्यापकांच्या खोलीतील सामान जळून खाक झाले आहे. पहाटे साधारण चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास लागले.

टिंबर मार्केटचा हा परिसर मोठा आहे. शेजारी लोकवस्तीदेखील आहे. या आगीमुळे शेजारी असलेल्या लोकवस्तीत खळबळ उडाली होती. साखर झोपेत असलेले नागरीक आगीचे लोट पाहून आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकून जागे झाले. या आगील सुमारे आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यादेखत ८ कुटुंबियांचा अख्खा संसार उद्वस्त झाला आहे.

घरातील सगळे सामान जळून खाक झाले आहे. जवळच असलेल्या एका चार मजली इमारतीमधील (मातृछाया ) खिडकीच्या काचा आगीच्या तीव्रतेने फुटल्या व खिडकीचे कापडी पडदे, टेरेसवर असणारे पत्र्याचे शेडदेखील जळून खाक झाले आहेत. पुण्यातील लाकडी सामानाची मोठी बाजारपेठ असलेल्या टिंबर मार्केटमध्य़े आग लागल्याने किरकोळ विक्रेत्यांचंदेखील नुकसान झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या