22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूचे ८ रुग्ण !

राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणूचे ८ रुग्ण !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.४ (प्रतिनिधी) राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असतानाच कोरोनाच्या नव्या विषाणूची बाधा झालेले ८ रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाचा नवा विषाणू अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे ब्रिटनबरोबरची विमानसेवा थांबवण्यात आली आहे. यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात असून अन्य देशातून येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येत आहे. करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले ३८ रुग्ण आत्तापर्यंत देशात आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.

यातील आठ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यात मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

 

मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखाला गंडविले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या