24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रसहा महिन्यात रस्ते अपघातात ८०६८ बळी

सहा महिन्यात रस्ते अपघातात ८०६८ बळी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं प्रमाण वाढले आहे. जानेवारी २०२२ ते जून २०२२ या सहा महिन्यात महाराष्ट्रामध्ये १७ हजार २७५ अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार ६८ जणांचा मृत्यू झाला. तर १४ हजार २०० जण जखमी झाले आहेत. २०२१ च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यात सहा हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १४ हजार ४२० अपघात झाले होते.

या अपघातात ११ हजार जण जखमी झाले. २०२० च्या महिल्या सहा महिन्यात ५ हजार २०९ जणांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत ११ हजार ४८१ अपघात झाले होते तर ९ हजार ६४१ जण जखमी झाले होते. २०२० आणि २०२१ च्या तुलनेत २०२२ जानेवारी ते जून यादरम्यान जास्त मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक आकडेवारी आहे.

यंदा नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू
जानेवारी २०२२ ते जून २०२२ यादरम्यान महाराष्ट्रात १७ हजार २७५ अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये ८०६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यात रस्ते अपघातात ५१८ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत नाशिक शहरात १०२ जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरमध्ये ४५१ जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला. पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातात मागील सहा महिन्यात ४६१ जणांचा मृत्यू झाला. तर पुणे शहरात १६५ जणांचा मृत्यू झाला. मुंबई शहरात रस्ते अपघातात १५६ जणांचा मृत्यू झाला. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात मुंबईमध्ये २०२ जणांचा मृत्यू झाला होता.

मागील चार वर्षातील स्थिती काय?
२०१८ मध्ये रस्ते अपघातात राज्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये १२७८८ तर २०२० मध्ये ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९-२० मध्ये अपघातातील मृताची संख्या घटली होती. मात्र, २०२१ मध्ये यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. २०२१ मध्ये रस्ता अपघातात १३ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला. २०२१ जानेवारी ते जून या कालावधीत सहा हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत आठ हजार ६८ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?
अकोला – ७६
अमरावती जिल्हा १८७
बुलढाणा २०४
यवतमाळ – २२६
वाशिम- ८२
औरंगाबाद- २५३
जालना-२०५
बीड – २५६
उस्मनाबाद -१८४
नांदेड – १९७
लातूर -१७७
परभणी – ९५
हिंगोली – ११०
कोल्हापूर – २४१
पुणे जिल्हा – ४६१
सांगली – २१३
सातारा – २७६
सोलापूर जिल्हा – ३२५
भंडारा -१०१
चंद्रपूर – २४२
गडचिरोली – ९१
गोंदिया – ७६
नागपूर जिल्हा – २६०
वर्धा – १२५
अहमदनगर – ४५१
धुळे – १९९
जळगाव – २९५
नाशिक जिल्हा – ५१८
नंदूरबार – १०२
रायगड – १४४
रत्नागिरी – ९५
सिंधुदुर्ग – ३८
ठाणे – ९४
पालघर – १६४
नागपूर शहर – १५७
पुणे शहर – १६५
ठाणे शहर – ११९
मुंबई शहर -१५६
नाशिक शहर – १०२
औरंगाबाद शहर – १०१
सोलापूर शहर – ३७
नवी मुंबई – १५६
अमरावती शहर – ५३
पिंपरी चिंचवड – १५२
एमबीव्हीव्ही- १०७

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या