36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रलक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण

लक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्य भागांसह मुंबईतही दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाऊनचा इशाराही सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान मुंबईत दररोज सापडणा-या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे.

बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करून घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ७८ टक्के ऍक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, मुंबईत ४९ टक्के ऍक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागच्या काही आठवड्यांतील डाटाचे विश्लेषण केल्यानंतर ७८ ते ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी म्हणाले. बाहेर फिरताना मास्क न वापरणा-यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

बुधवारी, २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असताना बुधवारी अचानक ही संख्या जवळजवळ दुपटीने वाढली आहे. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

मैदान केले बंद
मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारे ओव्हल मैदान शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही. गुरुवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून हे मैदान बंद करण्यात येणार आहे.

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले; तलाठ्यांनी नदीत पोहून ट्रॅक्टर केले जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या